धुळे – येथील बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळ्याच्या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागातील ३ अधिकार्यांसह एका कंत्राटी कर्मचार्याला पोलिसांनी १५ जानेवारीच्या रात्री अटक केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात महापालिकेचे साहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता, तसेच शिवसेनेने याविषयी अनेक वेळा आंदोलन करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे येथील महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांचाही या प्रकरणात समावेश आहे. यासमवेतच या प्रकरणात अन्य लोकप्रतिनिधींचा समावेश आहे का ? याचीही चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.