तमिळनाडूमध्ये हिंदूंच्या देवतांच्या ५ मूर्तींची तोडफोड करणार्‍या धर्मांध ख्रिस्त्याला अटक !

  • ख्रिस्ती मूर्तीभंजकाला अटक करण्यास पोलीस उदासीन !

  • हिंदु मुन्नानी ( हिंदू आघाडीवर) संघटनेने आंदोलन केल्यानंतर ख्रिस्त्याला अटक !

  • तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुक सरकार असल्यामुळे तेथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींच्या तोडफोडीच्या घटना वाढत आहेत. तेथे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन अपरिहार्य ! – संपादक
  • देवतांच्या मूर्तींचे भंजन करणार्‍या ख्रिस्त्याला अटक करण्यास टाळाटाळ करणारे ख्रिस्तीधार्जिणे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ? – संपादक

चेन्नई – तमिळनाडू राज्यातील दिंडीगुल जिल्ह्यातील वडामडुराई येथील श्री गणेश मंदिरातील देवतांच्या मूर्तींचे भंजन करणार्‍या बालकृष्णन् नामक बाटग्या ख्रिस्त्याला अटक करण्यात आली. बालकृष्णन् याने श्री गणेशाची मूर्ती, तसेच नागदेवतांच्या ४ मूर्ती अशा एकूण ५ मूर्ती फोडल्या. त्याने याच मंदिराच्या बाजूला असलेल्या वीरभद्र आणि रावणेश्‍वर मंदिरांच्या विद्युत्यंत्रणांची नासधूस केली. बालकृष्णन् याला अटक करण्यासाठी पोलीस उदासीन होते; मात्र हिंदु मुन्नानी या संघटनेने आंदोलन केल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

बाटग्या ख्रिस्त्याने मूर्तीभंजन केल्याचे वृत्त देण्यास प्रसारमाध्यमांची टाळाटाळ ! 

अशा प्रसारमाध्यमांवर हिंदूंनी बहिष्कार टाकल्यास आश्‍चर्य ते काय ? – संपादक

तमिळनाडूतील केवळ दिनामलार या वृत्तपत्राने ‘बालकृष्णन् या बाटलेला ख्रिस्ती आहे’, याची माहिती दिली; मात्र अन्य प्रसारमाध्यमांनी हे सूत्र हेतूपुरस्सर दाबले. तमिळनाडूत याआधीही मूर्तीभंजनाच्या अनेक घटना घडल्या आहेत; मात्र त्यास धर्मांध उत्तरदायी असतांनाही काही ठरावीक वृत्तसंकेतस्थळे वगळता प्रसारमाध्यमे त्याविषयी लिहिण्यास टाळतात.

तमिळनाडूमध्ये मूर्तीभंजनाच्या वाढत्या घटना 

१. २१ जून २०२१ : पुडूकोट्टाई जिल्ह्यातील शिवमंदिरात शिवलिंग, तसेच माता पार्वती, श्री गणेश आणि नंदी यांच्या मूर्तींची तोडफोड
२. ३० जून २०२१ : वेल्लीपूरम् येथील अम्मनदेवीच्या मूर्तीची तोडफोड
३. २५ जुलै २०२१ : धर्मांधांनी राणीपेठ येथील १ सहस्र ५०० वर्षे जुन्या मंदिरातील श्री अम्मनदेवी आणि श्री दुर्गादेवी यांच्या मूर्तींवरील वस्त्रे फाडली आणि मूर्तींवर वीर्य फेकले.
४. ७ सप्टेंबर २०२१ : पेरालंबूर येथे धर्मांधांनी यात्रेच्या काळात देवतांच्या मूर्तींच्या मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारे २ रथ पेटवले.
५. ७ ऑक्टोबर २०२१ : सिरूवाचूर येथे ९ मूर्तींची तोडफोड

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)