श्रीचित्‌शक्‍ति(सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. ‘साधक गुरूंच्या छायेतून बाहेर गेला, तर त्याच्यापुढे प्रारब्धाचा डोंगर उभा राहतो.

२. साधना करतांना आपले क्रियमाणही वापरणे आवश्यक !

आजारी साधकाने त्याची आध्यात्मिक पातळी कितीही असली, तरी संतांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय करायलाच हवेत. त्याशिवाय वैद्यकीय उपचारही करायला हवेत, तरच लवकर बरे वाटते. साधना करतांना सर्वकाही देवावर सोडून उपयोगाचे नाही; आपले क्रियमाणही वापरले पाहिजे, तरच योग्य पद्धतीने साधना केल्यासारखे होते.

३. सात्त्विक संगीत आणि तमोगुणी संगीत यांचा देहावर होणारा परिणाम अन् भारतीय संगीताचे वैशिष्ट्य

उच्च पातळीचे सात्त्विक संगीत ऐकल्यावर त्या संगीतामध्ये रममाण होऊन आपले डोके आपोआपच डोलू लागते. खालच्या पातळीचे, म्हणजे तमोगुणी संगीत ऐकल्यावर मनुष्याच्या शरिराचा रज-तमप्रधान दर्शक कटीखालचा भाग आपोआप हलू लागतो; म्हणूनच विदेशी संगीतावर सर्वजण कटी हलवून नाचतात, तर भारतीय संगीत मात्र शरिरासमवेतच तुमच्या मनालाही आनंद देते. भारतीय संगीतावर तुमचे मनही डोलते.

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (२०.१२.२०१९)