अमेरिकेत भारतीय वंशाच्या शीख टॅक्सीचालकाला मारहाण : महंमद हसनेन याला अटक !

जगभरात धर्मांध कुठेही अल्पसंख्य असले, तरी ते गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक

टॅक्सीचालकाला मारहाण करताना महंमद हसनेन

न्यू जर्सी (अमेरिका) – येथील जॉन एफ्. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वंशाच्या शीख टॅक्सीचालकाला मारहाण केल्याच्या प्रकरणी महंमद हसनेन याला न्यू जर्सी पोलिसांनी नुकतीच अटक केली. आरोपी महंमद याने ‘पगडीवाले लोक’, ‘तुमच्या देशात चालते व्हा’, अशा शब्दांत सदर शीख व्यक्तीविषयी द्वेष प्रकट केला, तसेच तिला धक्काबुक्कीही करत तिची पगडीही फाडली. यानंतर पोलिसांनी हसनेन याच्या मुसक्या आवळल्या. ‘शीख युती’चे कायदा संचालक अमृत कौर आक्रे यांनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध तत्परतेने कारवाई केल्याचे सांगत पोलिसांचे आभार मानले.