पुणे येथे नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

नायलॉनच्या मांजामुळे गळा कापल्याने प्रतिवर्षी अनेक लोक गंभीर घायाळ होतात, तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो, हे वास्तव लक्षात घेता मांजाची विक्री करणारे आणि ते वापरणारे यांवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक

नायलॉन मांजा

पुणे – नागरिक आणि पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण करणारा आणि कायद्याने विक्री करणे बंद असतांनाही प्लास्टीक, नायलॉन, सिंथेटिक यांसारख्या घातक मांजाची सर्रासपणे विक्री होत आहे. येथील बोहरी आळीत नायलॉन मांजा चोरून विक्री करणार्‍या जुनेद कोल्हापूरवाला आणि अदनान सय्यद यांना गुन्हे शाखेच्या ‘युनिट १’च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या दुकानातून नायलॉन मांजाचे १९ रिळ आणि रोख रक्कम असा ४९ सहस्र ९६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दोघांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.