‘वर्ष २००९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग इत्यादी विषयांवरील हस्तलिखितांच्या वर्गीकरणाची सेवा चालू होती. ही हस्तलिखित असलेल्या १५ खोक्यांमध्ये संगीत आणि नृत्य या विषयांशी संबंधित काही ग्रंथ आणि ध्वनीफिती होत्या. त्या वेळी एकेक विषय वाचून ते टंकलेखनासाठी द्यायचे होते. संगीत आणि नृत्य या विषयांशी संबंधित ग्रंथांविषयी परात्पर गुरुदेवांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हा विषय सध्या नको. काही वर्षांनी पाहूया.’’
तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘संगीत आणि नृत्य यांच्या माध्यमातून साधना होण्यासाठी अहं अल्प असावा लागतो. साधकांची तेवढी प्रगती झाली नसेल. काळाला आवश्यक ते गुरु करवून घेतात. सध्या काळ आलेला नाही.’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तो खोका तसाच बाजूला ठेवून दिला.
वर्ष २०१६ मध्ये संगीत विषयाची सेवा चालू झाली. त्या वेळी मला वरील प्रसंग आठवला. आता सूक्ष्मातील युद्धाचा स्तर वाढत चालला आहे. वाईट शक्ती निर्गुणातून आक्रमण करत आहेत; म्हणून ‘आकाशतत्त्वाशी संबंधित निर्गुण स्तरावरचे उपाय परात्पर गुरुदेवांनी काळाला अनुसरून चालू केले’, असे माझ्या लक्षात आले.’
– कु. कल्याणी गांगण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१.२०२०)