‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याच्या वेळी सातारा, सांगली आणि बेळगाव या जिल्ह्यांतील जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती

सातारा, सांगली आणि बेळगाव या जिल्ह्यांतील जिज्ञासूंनी १९.१२.२०२० या दिवशीच्या सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात सांगितलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.

सौ. भारती बनकर, सातारा

झोपेत असतांना नामजप चालू होणे आणि त्यातून चैतन्य अन् शक्ती जाणवणे : ‘आम्ही अधिक मासात सामूहिक नामजप करत होतो. एकदा मी गाढ झोपेत असतांना माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप होत होता. मला अकस्मात् जाग आल्यावर चैतन्य आणि शक्ती जाणवत होती.’

सौ. अनुजा मानसिंग घोरपडे, ईश्वरपूर, सांगली.

नामजप चालू केल्यापासून मुलांची प्रकृती चांगली होणे, घरातील तुळस वाढणे आणि घरातील वातावरणही प्रसन्न अन् आनंदी असणे : ‘पूर्वी माझी मुले सतत रुग्णाईत असायची; परंतु नामजप चालू केल्यापासून त्यांची प्रकृती चांगली आहे. माझ्या यजमानांचा व्यवसायही पुष्कळ चांगला चालू आहे. आमच्या घरातील तुळस कधी व्यवस्थित वाढत नव्हती. नामजप चालू केल्यापासून तुळस छान वाढत आहे. घरातील वातावरणही प्रसन्न आणि आनंदी असते.’

सौ. वर्षा शंकर देसाई, ईश्वरपूर, सांगली.

मुलगा सायकल चालवतांना पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागणे आणि गुरुदेवांचा धावा करत असल्याने ‘गुरुदेवांनी मुलाचे रक्षण केले’, असे जाणवणे : ‘माझा मुलगा इयत्ता सहावीत शिकत असतांना सायकल चालवतांना पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला. तो बराच वेळ शुद्धीवर आला नाही. तो पडल्याचे मला समजताच मी गुरुदेवांना आळवू लागले, ‘माझ्या मुलाचे रक्षण करा.’ माझे यजमान आणि दीर यांनी त्याला तातडीने रुग्णलयात नेले. तो शुद्धीवर आला; पण त्याच्या उलट्या थांबत नव्हत्या. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी ‘मोठ्या रुग्णालयात घेऊन जा’, असे सांगितले. त्याला कराड येथील मोठ्या रुग्णालयात घेऊन गेले. तेथे त्याच्यावर उपचार केल्यावर उलटी थांबली. त्याचे ‘सिटी स्कॅन’ केल्यानंतर ‘त्याची कवटी थोडी चेपली आहे; परंतु मेंदूला मार लागला नाही’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. ‘आम्ही सतत गुरुदेवांचा धावा करत असल्याने त्यांनीच माझ्या मुलाचे रक्षण केले’, असे वाटते.’

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक