उत्तर कोरियाने जपानी समुद्रात डागले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

प्रतिकात्मक छायाचित्र

सोल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाने जपानी समुद्रात (पूर्व समुद्रात) बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप दक्षिण कोरिया आणि जपान यांनी केला आहे. या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. हे क्षेपणास्त्र किती दूर पडले, हे अद्याप सांगता येणे कठीण आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांचे सैन्य या प्रकरणाचे अन्वेषण करत आहे.

या घटनेनंतर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा म्हणाले की, आम्ही चारही दिशांना असलेली जहाजे आणि विमाने यांची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करत आहोत. उत्तर कोरियाकडून पहिले क्षेपणास्त्र डागल्याची चर्चा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेशी झाल्यावर लगेचच दुसरे क्षेपणास्त्र डागले जाणे खेदजनक आहे.