पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे केशरचनाकार जावेद हबीब यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध !

राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने जावेद हबीबच्या प्रतिमेला जोडे मारून आणि प्रतिमेवर थुंकून आंदोलन

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – उत्तरप्रदेश येथील मुझफ्फरनगर शहरामध्ये केशरचनाकार (हेअर स्टायलिस्ट) जावेद हबीब यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी एका महिलेच्या डोक्यावरील केसांना पाणी न लावता थुंकून केस कापले. या कृत्यामुळे नाभिक समाजातून जावेद हबीब यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जावेद हबीब यांच्या निषेधार्ध राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जावेद हबीब यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि प्रतिमेवर थुंकून आंदोलन करण्यात आले.

(सौजन्य – S PRIME NEWS)

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने या घटनेचा जोरदारपणे निषेध करण्यात आला. या वेळी नाभिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जावेद हबीब यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.