पुणे – गेल्या ८ दिवसांत केलेल्या कोरोना चाचणीत पुण्यातील साधारण २३२ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. ३१ डिसेंबर या दिवशी ख्रिस्ती नव वर्षाचे स्वागत आणि १ जानेवारी या दिवशी पुण्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या शौर्यदिनाचा कार्यक्रम या दोन्ही वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
(सौजन्य – Saam TV News)
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. यात २०२ कर्मचारी आणि ३० पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.