सातारा, ११ जानेवारी (वार्ता.) – खासदार शरद पवार यांचे रयत शिक्षण संस्थेतील योगदान पहाता त्यांच्याविषयी बोलतांना आपली उंची तपासली पाहिजे. चांगल्या चाललेल्या संस्थेवर टिका करून तिला अपमानित करू नका, अन्यथा तुमचे स्वत:चे राजकारण संपेल, अशी धमकी वजा चेतावणी आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना दिली आहे. गत ४-५ दिवसांपासून रयत शिक्षण संस्थेमध्ये चालेल्या अपप्रकारांविषयी आमदार महेश शिंदे जाहीररित्या बोलत आहेत. त्यांना आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर देतांना ही चेतावणी दिली आहे. आमदार महेश शिंदे समर्थक या चेतावणीला धमकी समजत आहेत.