परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव भावसोहळा पहातांना पुणे येथील फणसळकर कुटुंबियांना आलेल्या आलेल्या अनुभूती आणि सोहळ्यानंतर जाणवलेले पालट येथे देत आहोत.
१. भावसोहळ्याच्या दिवशी ‘गुरुमाऊली सूक्ष्मातून घरी आली आहे’, असे जाणवणे आणि भावसोहळा पहातांना दैवी सुगंध येणे
‘१३ आणि १५.५.२०२० या दिवशी प.पू. गुरुमाऊलींचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) भावसोहळा आहे’, हे कळल्यानंतर ‘गुरुमाऊली घरी येणार’, या विचाराने आम्ही आनंदी झालो. भावसोहळ्याच्या दिवशी ‘गुरुमाऊली सूक्ष्मातून घरी आली आहे’, असे आम्हाला जाणवत होते. आम्ही घराबाहेर रांगोळी काढली होती आणि गुरुदेवांसाठी नैवेद्य बनवला होता. भावसोहळा बघतांना आमची भावजागृती होत होती आणि दैवी सुगंध येत होता. हा सुगंध कार्यक्रम संपल्यानंतर बराच काळ टिकून होता.
२. भावसोहळ्याच्या दिवशी गुरुमाऊलींच्या जीवनदर्शन ग्रंथावर वाहिलेली अबोलीची फुले ८ दिवस ताजी रहाणे
सोहळ्याच्या वेळी लावलेला तुपाचा दिवा रात्री १ वाजेपर्यंत तेवत होता. त्यानंतर आम्हाला झोप लागली. त्यामुळे ‘तो दिवा कधी शांत झाला ?’, ते समजले नाही. भावसोहळ्याच्या दिवशी गुरुमाऊलींच्या जीवनदर्शन (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन) ग्रंथावर वाहिलेली अबोलीची फुले ८ दिवस टवटवीत राहिली होती. भावसोहळा बघत असलेल्या खोलीत अधिक प्रकाश जाणवत होता.
३. भावसोहळा पाहिल्यानंतर जाणवलेले पालट
अ. भावसोहळा झाल्यापासून आम्हा सर्वांना पुष्कळ उत्साही वाटत आहे.
आ. आमच्याकडून गुरुदेवांचे अधिकाधिक स्मरण होत आहे आणि त्यांच्याशी अनुसंधान वाढले आहे. आमचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने आणि भावपूर्ण होत आहेत.
इ. ‘गुरुमाऊलींच्या आश्रमात राहून सेवा करत आहोत’, असा भाव वाढला आहे.’
– श्री. प्रशांत फणसळकर, सौ. अंजली प्रशांत फणसळकर आणि कु. गौरी प्रशांत फणसळकर (आताच्या सौ. गौरी कर्वे), कोथरूड, पुणे. (२६.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |