शिर्सुफळ (बारामती) येथील श्री शिरसाईदेवीच्या मंदिरात चोरी !

चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून गाव बंद

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! – संपादक

शिर्सुफळ (बारामती) येथील श्री शिरसाईदेवीचे मंदिर

बारामती (जिल्हा  पुणे) – तालुक्यातील शिर्सुफळ येथील श्री शिरसाईदेवीच्या मंदिरात मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह, २० किलोचा पितळीचा सिंह, पितळीच्या समया, पंचारती, धूपारती, ध्वनीक्षेपक आणि इतर साहित्य असा अनुमाने ३ लाखांचा ऐवज चोरून नेला. पहाटे मंदिरातील पुजारी आणि गावकरी काकड आरतीसाठी मंदिरात गेले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बारामती पोलिसांनी पंचनामा करून मंदिरातील ‘सीसीटीव्ही’तील चित्रीकरण पडताळण्याचे काम चालू केले आहे. तालुक्यातील हे जागृत देवस्थान असल्याने चोरीच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. लवकरात लवकर चोरांना पकडावे, अशी मागणी करून ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवून चोरीच्या घटनेचा निषेध केला आहे. चोरीच्या घटनांना आळा बसावा, यासाठी गावागावांत गस्त घालण्याची आवश्यकता असल्याचे मत सरपंच आप्पासाहेब आटोळे यांनी व्यक्त केले आहे.