मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला रेल्वेस्थानकांवर बाँब ठेवला असल्याच्या धमकीचा निनावी दूरभाष पोलिसांना ६ जानेवारीच्या रात्री आला होता. हा धमकीचा दूरभाष आल्यानंतर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. या दूरभाषची माहिती सर्व यंत्रणांना देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकात रेल्वे पोलीस, आर्.पी.एफ्, बाँब शोधक आणि निकामी पथक अन् श्वानपथक यांद्वारे पडताळणी मोहीम चालू केली; मात्र पडताळणीच्या वेळी रेल्वेस्थानकावर संशयास्पद काहीही आढळून आले नाही. परिणामी धमकीचा दूरभाष करणार्या आरोपीला मध्यप्रदेशातील जबलपूर येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव जितेश ठाकूर आहे.