अमृता फडणवीस यांची राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना अब्रुहानीची नोटीस

डावीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना अब्रुहानीची नोटीस पाठवली आहे.

विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा ‘डॉन्सिंग डॉल’ असा उल्लेख केला होता. यावर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना ही नोटीस पाठवली आहे.

याविषयी अमृता फडणवीस ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘‘आपल्याच सुनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे नेता विद्याहीन चव्हाण, आता न्यायालयातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरवलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतःला, मगच मिळेल तुला निर्वाण’’