‘५.८.२०२० या दिवशी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा आयोजित केला होता. त्याच्या आदल्या दिवसापासून माझ्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांविषयी पुष्कळ कृतज्ञता दाटून येऊ लागली. ‘हे सर्व त्यांच्या कृपेमुळे पहायला मिळत आहे’, या विचाराने माझा भाव जागृत होत होता. अयोध्येत श्रीरामाच्या जन्मभूमीवर सोहळा साजरा होत असतांना मला तिथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते. भूमीपूजनासाठी जमिनीच्या आत सिद्ध केलेली जागा पाहून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण झाले. प्रत्यक्षात संपूर्ण कार्यक्रम पहायला मिळाला नाही, तरीही दिवसभर परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण होऊन पुष्कळ आनंद मिळत होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितल्यानुसार खरंच हा कृतज्ञताकाळ आम्हा सर्व साधकांना अनुभवायला मिळत आहे.
‘हे गुरुराया, कृतज्ञता कशी व्यक्त करू ? सर्वकाही आपलीच कृपा आहे. ‘आम्हा सर्वांच्या मनात अखंड कृतज्ञताभाव आपणच निर्माण करावा’, अशी आपल्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे.’
– सौ. नेहा अमोल मेहता, पुणे (१३.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |