राजस्थानमधील रघुनाथ मंदिरातील देवतांच्या मूर्तींची चोरी

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! – संपादक

जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या बगडी गावामधील रघुनाथ मंदिरातील श्रीरघुनाथ आणि श्री गणेश यांच्या मूर्तींची, तसेच चांदीचे मुकुट अन् छत्र यांची चोरी करण्यात आली आहे. पोलीस चोरीचे अन्वेषण करत आहेत. देवतांच्या मूर्ती पितळीच्या आहेत; मात्र चोरट्यांना त्या सोन्याच्या वाटल्याने त्यांनी त्या चोरल्या असतील, असे नागरिकांनी सांगितले.