ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवावेत !

वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

वर्धा, २५ डिसेंबर (वार्ता.) – ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने राज्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे आणि अन्य सार्वजनिक स्थळे या ठिकाणी होणार्‍या अपप्रकारांवर प्रतिबंध घालावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ डिसेंबर या दिवशी येथील निवासी जिल्हाधिकारी नितीन पाटील यांना निवेदन देण्यात आले. ३१ डिसेंबरपर्यंतच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशा घटनांवर, तसेच फटाके फोडण्यावर बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी डॉ. पंडित थोटे आणि सौ. भक्ती थोटे, सौ. वंदना कलोडे, सौ. वर्षा गज्जलवार आदी उपस्थित होते.