‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/532929.html
३. आतंकवाद आणि त्यातील अंतर्भूत घटक
सध्या आमच्याकडे आलेला नास्तिकतावाद विदेशातून आयात झाला आहे. अनेक नास्तिकतावाद्यांच्या लिखाणात चर्चने गॅलिलिओला कशी आणि का शिक्षा दिली ? इत्यादी तेच ते पुनःपुन्हा येते. जागतिक स्तरावर आतंकवादाच्या करण्यात आलेल्या सर्वसाधारण व्याख्या अजूनही ढोबळ आहेत. त्यात प्रामुख्याने खालील गोष्टी आढळून येतात.
अ. एखाद्या समुहाच्या (मग तो भाषीय, जातीय, प्रादेशिक अथवा धार्मिक असो) मागण्यांसाठी घातपाती कृत्ये करणे.
आ. ही कृत्ये करून त्या समुहाच्या मागण्यांविषयी प्रसिद्धी मिळवणे.
इ. या घातपाती कृत्यांमध्ये विरोधी, तटस्थ किंवा ‘कुणीही’ असू शकतात. जेव्हा रेल्वेमध्ये स्फोट केला जातो किंवा मंदिरात गोळीबार केला जातो, तेव्हा रेल्वेत किंवा मंदिरात कोण माणसे आहेत ? हे पाहिले जात नसते. ते समुहातील ‘कुणीही’ अज्ञात असतात.
ई. यातून दहशत निर्माण करून स्वत:ची राजकीय अथवा तत्सम उद्दिष्टे साध्य केली जातात.
(क्रमश: पुढच्या रविवारी)
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (मे २०२१)