नंदुरबार – विविध समाजातील सुमारे १० सहस्रांहून अधिक जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला असून तशी ऑनलाईन नोंदणीही त्यांनी केली आहे. त्या सर्वांना नंदुरबार येथे २६ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता होणार्या बौद्ध धम्म परिषदेत दीक्षा दिली जाणार आहे, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुनील रामोशी यांनी २३ डिसेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.