मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी (२५.१२.२०२१) या दिवशी गावणवाडी, कोतवडे, जिल्हा रत्नागिरी येथील (५५ टक्के आध्यात्मिक पातळीची) कु. मुमुक्षा महेश्वर वझे हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिने केलेली कविता पुढे दिली आहे.
कु. मुमुक्षा महेश्वर वझे हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मुमुक्षा महेश्वर वझे ही या पिढीतील एक आहे !
शक्ती दे, शक्ती दे । आई भवानी, शक्ती दे ।
हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आम्हा शक्ती दे ।। १ ।।
शक्ती दे, शक्ती दे । आई सरस्वतीमाते, शक्ती दे ।
हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आम्हा बुद्धी दे ।। २ ।।
शक्ती द्या, शक्ती द्या । परमपिता ब्रह्मा, आम्हाला शक्ती द्या ।
हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आम्हा शक्ती द्या ।। ३ ।।
शक्ती द्या, शक्ती द्या । गुरुदेव, आम्हा शक्ती द्या ।
हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आम्हा शक्ती द्या ।। ४ ।।
शक्ती दे, शक्ती दे । आई लक्ष्मीमाऊली, शक्ती दे ।
साधनेत पुढे जाण्यासाठी आम्हा शक्ती दे ।। ५ ।।
शक्ती दे, शक्ती दे । पार्वतीमाते, शक्ती दे ।
गुरुदेव अन् हिंदु राष्ट्र यांची सेवा करण्यासाठी शक्ती दे ।। ६ ।।
शक्ती दे, शक्ती दे । महादेवा, आम्हाला शक्ती दे ।
स्वभावदोषरूपी असुरांचा नायनाट करण्यासाठी शक्ती दे ।। ७ ।।
हे देवीदेवतांनो आणि गुरुमाऊली, वचन देतो ।
आम्ही हिंदु राष्ट्र स्थापन करूनच राहू । मागे हटणार नाही ।। ८ ।।
– कु. मुमुक्षा महेश्वर वझे (वय ८ वषे), गावणवाडी, कोतवडे, रत्नागिरी (२१.२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |