हलाल प्रमाणपत्र रहित करावे यासाठी शासनाला निवेदन देणार !

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचा निर्धार

अंबाजोगाई (जिल्हा बीड), १९ डिसेंबर (वार्ता.) – ‘हलाल जिहाद’ हे भारतासमोरील वैश्विक संकट आहे. तलवारीच्या बळावर धर्मांधांनी हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर केले. आता विविध जिहादच्या माध्यमांतून हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. इंग्लंडमध्ये ‘संस्कृत’ हा विषय विद्यापिठातील अभ्यासक्रमात अनिवार्य करण्यात आला. स्कॉटलंडमध्ये कोरोनाच्या संसर्ग काळामध्ये मंत्रपठण करून कोरोनाबाधितांवर उपचार केले, तसेच त्यांनी त्यास प्रतिसादही दिला. असे असतांना भारतामध्ये हिंदूंना धर्मशिक्षण घेण्यापासून वंचित ठेवले जात आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. येथील ह.भ.प. गरजाळे गुरुजी यांच्या निवासस्थानी १० डिसेंबर या दिवशी श्री संत सावता महाराज भजनी मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

या बैठकीला वारकरी संप्रदायातील २५ प्रवचनकार आणि कीर्तनकार उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्ष ह.भ.प. अच्युत महाराज जोशी हे होते, तर प्रास्ताविक ह.भ.प. नागनाथ गरजाळे गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ह.भ.प. अंबादास चिक्षे गुरुजी यांनी मानले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. विक्रम घोडके, सौ. सुनिता पंचाक्षरी, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्थित होते. श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले की, सध्या देशामध्ये आतंकवाद्यांवर ७०० हून अधिक खटले चालू आहेत. त्यासाठीचा खर्च हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संघटनांच्या माध्यमातून केला जात आहे. शाहीनबाग सारख्या आंदोलनांनाही या संघटना पैसा पुरवत आहेत. त्यामुळे शासनाने हलाल प्रमाणपत्रावर बंदी आणायला हवी.

विशेष

‘हलाल जिहाद’ हा विषय ऐकल्यानंतर धर्मशिक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन उपस्थितांनी प्रतिपंधरा दिवसांनी कृतीचा आराखडा निश्चित करण्यासाठी एकत्र येण्याचा निश्चय केला, तसेच हलाल प्रमाणपत्र रहित करावे, यासाठी शासनाला निवेदन देण्याचा निर्धार केला.