मुंबई, १७ डिसेंबर (वार्ता.) – पितांबरी समूहाच्या वतीने दत्तजयंती निमित्ताने ‘श्रीदत्तनामाचा महिमा’ या भक्तीमय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ डिसेंबर या दिवशी दत्तजयंती आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी दत्ताच्या उपासनेविषयी माहिती आणि आलेल्या अनुभूती सांगणारा व्हिडिओ, आपल्या गावातील दत्ताच्या मंदिरातील श्री दत्तजयंतीच्या उत्सवाची माहिती, तसेच इतिहास सांगणारा व्हिडिओ पाठवायचा आहे. व्हिडिओ ८४५०९७१३९७ या ‘व्हॉट्सअप’ क्रमांकावर किंवा ‘[email protected]’ या मेलवर पाठवावा, असे आवाहन पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले आहे.
यांतील निवडक व्हिडिओ पितांबरीच्या ‘फेसबूक पेज’ वरून प्रसारित करण्यात येणार आहेत. व्हिडिओ करतांना भ्रमणभाष आडवा धरावा. व्हिडिओ ३ मिनिटांपेक्षा अधिक नसावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. व्हिडिओसमवेत नाव, पत्ता, गाव, देवस्थानचे नाव आदी माहिती पाठवावी. व्हिडिओ पाठवण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर आहे. यामध्ये अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समुहाकडून करण्यात आले आहे.