प्रजा फाऊंडेशनकडून धक्कादायक माहिती उघड
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही ६५ सहस्र नागरिकांसाठी एकच चिकित्सालय असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !- संपादक
मुंबई – ‘प्रजा फाऊंडेशन’ नावाच्या संघटनेकडून आमदारांच्या कामाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत दिलेल्या माहितीतून मुंबईत ६४ सहस्र ७०० लोकसंख्येसाठी एकच चिकित्सालय आहे, तसेच प्रत्येक १ लाख मुंबईकरांमागे २९८ जणांना क्षयरोग होत आहे, या गोष्टी उघड झाल्या आहेत.