कोरोनाची लागण झालेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या इमारती महानगरपालिकेकडून सील !

अमृता अरोरा आणि करीना कपूर

मुंबई – कोरोनाची लागण झालेल्या अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा, तसेच करण जोहर यांच्या इमारती महानगरपालिकेने ‘सील’ केल्या आहेत. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांची कोरोनाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यामुळे महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली.

चित्रपट निर्माते करण जोहर यांच्या निवासस्थानी ८ डिसेंबर या दिवशी झालेल्या पार्टीमध्ये करीना कपूर, अमृता अरोरा यांसह चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार सहभागी झाले होते. करीना कपूर आणि अमृता अरोरा यांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यामुळे पार्टीला उपस्थित सर्व कलाकारांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये करण जोहर यांची कोरोनाची चाचणी ‘निगेटिव्ह’ आहे, तर अभिनेता सोहेल खान यांची पत्नी सीमा आणि संजय कपूर यांची पत्नी महिप यांना कोरोनाची लागण झाली आहे. पार्टीला उपस्थित अन्य काही कलाकारांचा कोरोनाचा अहवाल अद्याप यायचा आहे.