बेळगाव येथील पुष्पांजली पाटणकर यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होण्यापूर्वी त्यांना आलेल्या सुंदर अनुभूती !

‘देवा, खरं सांगू ‘६० टक्के आध्यात्मिक पातळी म्हणजे विशेष’, असे मला वाटले नाही; पण पातळी घोषित होण्यापूर्वी १५ दिवस आधी देवाने ज्या अनुभूती दिल्या, त्या पाहून असे वाटले की, ‘देवाचे आपल्यावर लक्ष आहे.’

पुष्पांजली पाटणकर

१. वसंत ऋतू नसतांनाही कोकिळा गात आहे. पावसाचा ऋतू (पावसाळा) असूनही तिला कंठ फुटला.

२. समोरच्या झाडाखाली २ मोर पुष्कळ वेळ नाचत होते.

३. वसंत ऋतू नसतांनाही फुलझाडे फुलांनी बहरली होती. भूमीवर फुलांचा सडा पडला होता.

४. पू. श्री काका (सेवानंद महाराज) स्वप्नात आले. ते माझ्याशी पुष्कळ वेळ बोलले. त्यांनी मला त्यांच्याकडील बॅगेतून काही वस्तू काढून दिल्या. मी त्यांना ‘अल्पाहार देते’, असे म्हणाले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘बघ, इतके साधक आहेत. माझ्याकडे कुणाचे लक्ष आहे का ? तू लगेच विचारलेस.’’

५. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ९ वाजता कृतज्ञतेचे काव्य लिहिले गेले.

६. मागील ८ – १५ दिवस कृष्णाच्या अनुभूती येत होत्या. (१० – १२ अनुभूती मी लिहून ठेवल्या आहेत.)

७. स्वप्नात मी ग्रंथालयात जाऊन तिथल्या खणातील पुस्तके पहात होते. एक सोनेरी रंगाचे पुस्तक होते. आत निळी पाने होती. प्रत्येक पानावर सुवर्णाच्या चमकदार अक्षरांत ‘श्रीकृष्ण दर्शन’ असे लिहिले होते.

८. हत्ती जोडलेला चांदीचा रथ दारासमोर उभा होता.

९. पूजा करतांना हृदयातून अखंड ‘कृष्ण-कृष्ण-कृष्ण’ ऐकू येत होते. डोळ्यांतून अखंड अश्रू येत होते.

‘देवा, ६० टक्के पातळीला इतक्या अनुभूती, मग ७० टक्के आणि ८० टक्के पातळीला किती सुंदर अनुभूती असतील ?

वास्तविक आपले सतत देवाकडे ‘लक्ष’ हवे (असेलही कदाचित्); पण ‘देवाचे आपल्यावर किती लक्ष आहे ?’, हे पाहून आनंदाने ऊर भरून आला.

कृतज्ञता देवा, कृतज्ञता ! शतवार कृतज्ञता !’

– कृष्णपुष्प (पुष्पांजली), बेळगाव (६.८.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक