१४ डिसेंबर २०२१ या दिवशी ‘गीता जयंती’ आहे. यानिमित्ताने…
भगवद्गीतेचे भाषांतर करणार्या अन्य पंथियांचेही हृदय परिवर्तन होणे
हिंदु धर्मातील ‘श्रीमद्भगवद्गीता’ या महान आणि पवित्र ग्रंथाचे अनेक भाषांतील भाषांतरकारांनी भाषांतर केले. भाषांतर करतांना भाषांतरकारांच्या मनावर प्रभाव पडून आणि त्यांचे हृदय परिवर्तन होऊन त्यांनी हिंदु धर्म स्वीकारणे, ही हिंदु धर्माची महानता दर्शवते. त्यांपैकी काही भाषांतरकारांची उदाहरणे पाहूया.
१. ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाचे महंमद मेहरूल्लाह यांनी उर्दूमध्ये प्रथम भाषांतर केले. त्यांनी काही दिवसांनी ‘सनातन धर्म’ स्वीकारला.
२. ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाचे अल फतेह कमांडो नावाच्या फिलीस्तानी व्यक्तीने अरबीमध्ये भाषांतर केले. कालांतराने ती व्यक्ती जर्मनीतील ‘इस्कॉन’ या धार्मिक संस्थेशी जोडली गेली, म्हणजे तिने ‘हिंदुत्व’ स्वीकारले.
३. ज्या व्यक्तीने इंग्रजी भाषेत श्रीमद्भगवद्गीतेचे भाषांतर केले ती व्यक्ती, म्हणजे चार्ल्स विलिक्नोक्स होती. त्यांनीही कालांतराने हिंदु धर्म स्वीकारला. ‘जगामध्ये केवळ हिंदु धर्मच टिकून राहील,’ असे त्यांचे मत होते.
४. ‘हिब्रू’ भाषेत भाषांतर करणारे बेजाशन ले फैनेह (Bezashition le fanah) हे इस्रायल या देशातील असून त्यांनी कालांतराने भारतात येऊन हिंदु धर्म स्वीकारला.
५. रशियन भाषेमध्ये प्रथम भाषांतर करणारी नोविकोक नावाची व्यक्तीही पुढे जाऊन श्रीकृष्णाची भक्त बनली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
६. ज्या व्यक्तीने ‘कुराण’चे प्रथम बंगाली भाषेमध्ये भाषांतर केले, त्या गिरीश चंद्र यांनी ‘इस्लाम’ स्वीकारला नाही. याचे कारण म्हणजे भाषांतर करण्यापूर्वीच त्यांनी ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाचे वाचन केले होते.
ही आहे ‘सनातन धर्म’ आणि त्यातील धर्मग्रंथ यांची शक्ती !’
(साभार : मासिक ‘वैदिक उपासना’, १३ डिसेंबर २०१९ ते १० जानेवारी २०२०)