दिवाळी आणि ईर्शाद यांचा काय संबंध ?

  • ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाला ‘ईर्शाद’ नाव देऊन अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन

  • नाशिक येथील ‘धर्मजागरण’ संघटनेचे हिंदु धर्मरक्षक प्रमुख श्री. उदय उपासनी यांनी घेतला खरमरीत समाचार

प्रतिकात्मक छायाचित्र

दिवाळीच्या निमित्ताने पुणे येथे मागील अनेक वर्षांपासून ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक ‘ईर्शाद’ नाव देऊन अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करण्यात आला. याविषयी नाशिक येथील ‘धर्मजागरण’ संघटनेचे हिंदु धर्मरक्षक प्रमुख श्री. उदय उपासनी यांनी या कार्यक्रमाचे तिकीट विकणार्‍या आदित्य सरनाईक यांचा खरमरीत समाचार घेतला. या वेळी उपासनी यांनी ‘ईर्शाद आणि दिवाळी यांचा काय संबंध आहे ? दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमानिमित्त हिंदूंकडून कार्यक्रमाच्या तिकिटाचे पैसे घेऊन कार्यक्रमाला ‘ईर्शाद’ नाव देण्याचा काय संबंध ?’, असे प्रश्न उपस्थित केले. या वेळी उपासनी यांनी कार्यक्रमाचे नाव पालटून ‘दिवाळी पहाट’, असे देण्याची विनंती केली, तसेच ‘नाव न पालटल्यास कार्यक्रम बळजोरीने बंद करू’, अशी चेतावणीही दिली.

(हिंदु सणानिमित्त घेण्यात येणार्‍या कार्यक्रमाला उर्दू रंग देण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करणारे श्री. उपासनी यांचे अभिनंदन ! हिंदूंच्या सणांच्या वेळी आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांना इस्लामी नाव देण्याचा कशा प्रकारे वैध मार्गाने विरोध करता येऊ शकतो, हे या प्रसंगातून हिंदूंनी लक्षात घ्यावे आणि तसा प्रयत्न नेहमीच करावा ! – संपादक)