कुटुंबियांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर साधकाला आलेल्या अनुभूती !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप डोळ्यांसमोर आल्यावर कृतज्ञताभावाने साधकाला सुचलेले काव्य !

जीव व्याकुळ झाला तुम्हा भेटण्याला ।
आता नाही राहू शकत तुमच्याविना ।। १ ।।

का, कसा अन् किती वेळ झाला तुम्हाला भेटून ।
तुमच्या सेवेला मीच पडलो न्यून ।। २ ।।

तुम्ही भेटलात अन् ।
आता धन्य झालो ।। ३ ।।

श्री. भाऊसाहेब लटपटे

२. औषधोपचाराने बरा न झालेला आजार आध्यात्मिक उपायांमुळे पूर्ण बरा होणे

२००७ मध्ये माझ्या पत्नीला ‘वात’ झाल्याने तिला पुष्कळ त्रास झाला, तरीही ती सारखा नामजप करायची. रुग्णाईत असतांना तिला औषधांचा गुण आला नाही. घरी आल्यावर मिठाच्या पाण्याचे उपाय, नामजप आणि आश्रमातून सांगितलेले आध्यात्मिक उपाय करून ती पूर्ण बरी झाली. आता ती प्रतिदिन आठ ते दहा घंटे सेवा करते.

३. पत्नीचा सेवेविषयीचा भाव पाहून ‘स्वतःमध्येही तो भाव यावा’, असे वाटणे

माझ्या पत्नीला कधी सेवेला जाता आले नाही किंवा मी जाऊ दिले नाही, तर ती घरात दुःखी होऊन बसते. तिचा सेवेविषयी भाव पुष्कळ आहे. तिचा ईश्वराप्रतीचा भाव पाहून ‘माझा ईश्वराप्रती एवढा भाव का नाही ?’, याची मला खंत वाटते. रामनाथी आश्रमात आल्यामुळे मला स्वतःमध्ये पुष्कळ पालट जाणवत आहेत. आता मी तिला कधीच सेवेला जाण्यापासून थांबवणार नाही.

४. रामनाथी आश्रम पाहिल्यावर ‘धन्य झालो’, असे वाटणे

सनातनच्या रामनाथी आश्रमाविषयी जेवढे ऐकले होते, त्यापेक्षा आश्रम अतिशय उत्तम आहे. येथील वातावरणातील चैतन्याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. मी यापूर्वी असा आनंद कधीच अनुभवला नाही. ‘आश्रमदर्शन करून आज मी धन्य झालो’, असे मला वाटले.

‘देवा, नामजप आणि सेवा यांच्या माध्यमातून मला आयुष्यभर सनातन संस्थेशी जोडून ठेव’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. भगवंताने गेल्या काही दिवसांत माझ्या आयुष्यात जे काही प्रसंग घडवून आणले, त्यामुळे माझ्यात सकारात्मक पालट झाला आहे. त्यासाठी मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. भाऊसाहेब लटपटे, संभाजीनगर (१४.६.२०१९)