काँग्रेसने २६/११ च्या मुंबई आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

‘२६/११ मुंबई आतंकवादी आक्रमण : काँग्रेसचे हिंदुविरोधी षड्यंत्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणारी काँग्रेस हिंदूविरोधीच ! – संपादक  

कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

मुंबई – आपण गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून जिहादी विचारधारेशी लढत आहोत. जोपर्यंत पाक अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपल्या देशावर आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे पाकिस्तान आणि जिहादी विचारधारा यांना नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे. देशात काँग्रेसची सत्ता असतांना वर्ष २००४ ते २००८ या कालावधीत देहली, वाराणसी, अयोध्या, जयपूर, भाग्यनगर (हैद्राबाद), मुंबई, पुणे, मालेगाव आदी विविध ठिकाणी पाकिस्तानातील ‘आय.एस्.आय.’ ने भारतात बसलेल्या राजकीय नेत्यांच्या साहाय्याने बाँबस्फोट घडवून आणले. मुंबई येथील २६/११ चे आतंकवादी आक्रमण हा त्याचा कळसबिंदू होता, जेणेकरून हे सांगता यावे की, मुंबई येथील २६/११ चे आक्रमण यासह मालेगाव, समझोता एक्सप्रेस येथील बाँबस्फोट हा ‘हिंदु आतंकवाद’ होता. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेले आतंकवादी आक्रमण हे पूर्वनियोजित होते, हे आता कुठे लोक बोलायला लागले आहेत. हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा उभा करण्यासाठी काँग्रेसने २६/११ च्या मुंबई आतंकवादी आक्रमणाचे षड्यंत्र रचले. यातून बहुसंख्य हिंदूंचे धैर्य खचवून, अल्पसंख्यांकांना एकत्र करून सत्तेत टिकून रहाण्याची काँग्रेसची योजना होती, असे परखड प्रतिपादन भारतीय सुरक्षा विशेषज्ञ, संशोधन आणि विश्लेषण शाखेचे (रॉ) माजी अधिकारी अन् भारतीय सेना अधिकारी कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘२६/११ मुंबई आतंकवादी आक्रमण : काँग्रेसचे हिंदुविरोधी षड्यंत्र !’ या विषयावर २७ नोव्हेंबर या दिवशी ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. या परिसंवादात भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर्.वी.एस्. मणि, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम ३ सहस्र ८४ जणांनी पाहिला.

तत्कालीन राजकीय नेत्यांनी योग्य हस्तपेक्ष केला असता, तर २६/११ चे आक्रमण रोखता आले असते ! – आर्.वी.एस्. मणि, माजी अवर सचिव, गृह मंत्रालय, भारत सरकार

श्री. आर्.वी.एस्. मणि

 

तत्कालीन राजकीय नेत्यांकडून योग्य हस्तपेक्ष झाला असता, तर २६/११ चे आतंकवादी आक्रमण रोखले जाऊ शकले असते; मात्र तसे झाले नाही. ‘हिंदु आतंकवाद’ हा एक भ्रम होता. २६/११ चे आक्रमण हा याचा एक भाग होता. त्यानंतर याविषयी लिहिली गेलेली पुस्तके ‘हा हिंदु आतंकवाद कसा होता ?’, हे सिद्ध करण्यासाठी होती; मात्र आता जनतेसमोर सत्य उजेडात आले आहे. तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडल्याने २६/११ चे आतंकवादी आक्रमण हे ‘हिंदु आतंकवाद’ असल्याचे त्यांना (षड्यंत्र रचणार्‍यांना) सिद्ध करता आले नाही.

काँग्रेसने अस्तित्वात नसलेला ‘हिंदु आतंकवाद’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले, अन्यथा ‘२६/११ चे आतंकवादी आक्रमण हा हिंदु आतंकवाद होता’, असे सिद्ध करण्याची काँग्रेसची ‘स्क्रिप्ट’ तयार होती. (काँग्रेसने षड्यंत्र रचले होते.) हिंदूंनी तुकाराम ओंबळे यांचे बलीदान कधीही विसरू नये. काँग्रेसने अस्तित्वात नसलेला ‘हिंदु आतंकवाद’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंनी अजूनही सतर्क राहून देशविरोधी शक्तींच्या विरोधात संघटित झाले पाहिजे. भारताचे पुन्हा विभाजन टाळायचे असेल, तर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे.