मुंबईत १६ सहस्र ३४३ कुपोषित बालके !

मुंबई – मुंबई उपनगरासारख्या प्रगत जिल्ह्यात १६ सहस्र ३४३ कुपोषित बालके आढळून आली. मुंबईत कुपोषित बालके आढळणे, हे चिंताजनक आहे. अंगणवाडी सेविकांच्या प्राथमिक पहाणीतून हे समोर आले. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना निश्चित करून पुढील १० दिवसांत लेखी अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले. यासंदर्भात उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही देशात कुपोषणाची समस्या असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !