काही गोवंशीय बेशुद्धावस्थेत आढळले
पोलिसांनी असा प्रकार करणार्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे ! – संपादक
सुधागड (जिल्हा रायगड) – येथील तालुक्यातील कसईशेत गावातील ८ गोवंशीय ३ डिसेंबर या दिवशी चोरण्यात आले, तर काही गोवंशीय बेशुद्धावस्थेत आढळले. याप्रकरणी शेतकरी परशुराम निरगुडा आणि इतर ग्रामस्थ यांनी जांभूळपाडा पोलीस दूरक्षेत्र येथे तक्रार प्रविष्ट केली आहे. सुधागड तालुक्यातील परळी आणि जांभूळपाडा विभागात गोवंशियांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. नंतर त्यांची चोरी झाली.