त्रिपुरा येथे रजा संमत होऊनही जाऊ न दिल्याने सैनिकाकडून वरिष्ठांची गोळ्या झाडून हत्या

मन : स्वास्थ्य गमावून टोकाचे पाऊल उचलणारे सैनिक देशरक्षणात कसे योगदान देणार ! – संपादक

रायफलमन सुकांता दास

सिपाहिजाला (त्रिपुरा) – येथील ‘ओ.एन्.जी.सी. गॅस कलेक्शन स्टेशन’जवळ असलेल्या ‘त्रिपुरा स्टेट रायफल्स’च्या तळावर ‘रायफल्स’च्या ५व्या बटालियनचा रायफलमन सुकांता दास याने त्याचे वरिष्ठ साथीदार सुभेदार मार्का सिंग जमातिया आणि नायब सुभेदार किरण जमातिया यांना गोळ्या घालून ठार केले. यानंतर दास याने मधुपूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. सुकांता दास यांनी रजेसाठी अर्ज दिला होता. त्यांची रजा संमत होऊनही त्यांना जाऊ दिले जात नव्हते. यावरून त्यांचा वरिष्ठांशी वाद होऊन त्यांनी वरील कृत्य केले.