अल्पवयीन मुली असुरक्षित असणे हे समाजाची नीतीमत्ता खालावल्याचे उदाहरण ! – संपादक
सातारा, ५ डिसेंबर (वार्ता.) – येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन कोल्हापूर आणि सातारा येथील विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सातारा येथे रहाणार्या एका अल्पवयीन मुलाने त्यांच्या परिसरामध्ये रहाणार्या एका अल्पवयीन मुलीला ऑगस्ट २०२१ मध्ये पळवून नेले. तेव्हापासून २ डिसेंबरपर्यंत कोल्हापूर आणि सातारा येथे विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. याविषयी पीडित मुलीच्या पालकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.