सातारा, ४ डिसेंबर (वार्ता.) – शिव-समर्थांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानच्या विश्वस्तपदाच्या नेमणुका नुकत्याच घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये श्री रामदास स्वामी संस्थानच्या अध्यक्षपदी सु.ग. तथा बाळासाहेब स्वामी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा न्यायाधिश यांनी घोषित केले.
विश्वस्तांच्या नियुक्त्या पुढील ६ वर्षांसाठी असणार आहेत. यामध्ये सातारा येथील समाजसेविका जोत्स्नाताई कोल्हटकर, अधिवक्ता महेश कुलकर्णी, दीपक पाटील आणि वैद्य अनंत निमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.