आम्ही पाकमधील उद्योग बंद करण्याचा आदेश द्यायचा का ?

‘पाकिस्तानमधील हवेमुळे देहलीतील हवा प्रदूषित’ या युक्तीवादावरून सर्वाेच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला प्रश्न

नवी देहली – राजधानी देहलीतील प्रदूषण वाढवण्यात उत्तरप्रदेशातील उद्योगांची कोणतीच भूमिका नाही. पाकमधून येणारी प्रदूषित हवा देहलीतील हवा दूषित करत आहे, असा अजब तर्क उत्तरप्रदेश सरकारकडून सर्वाेच्च न्यायालयात मांडण्यात आला. यावर न्यायालयाने सरकारला ‘आम्ही पाकिस्तानमधील उद्योग बंद करण्याचा आदेश द्यायचा का ?’, असा प्रश्न विचारला.

देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथील प्रदूषणावरील सुनावणीच्या वेळी हा युक्तीवाद करण्यात आला.