मुंबई – संपातून माघार घेत कामावर रूजू होणार्या महाराष्ट्र्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांकडून प्रशासन पुन्हा संप न करण्याचे हमीपत्र घेत आहे. वेतनवाढ आणि महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागण्यांसाठी राज्यात महामंडळाच्या कर्मचार्यांनी संप पुकारला होता. सरकारने वेतनवाढीची घोषणा केल्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले; मात्र ‘भविष्यात संप करणार नाही’, अशा आशयाच्या हमीपत्रावर कर्मचार्यांची स्वाक्षरी घेतली जात आहे. हे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. ‘भविष्यातील संपात सहभागी झाल्यास प्रशासनाकडून होणारी कारवाई मान्य असेल’, असेही वचनपत्रात म्हटले आहे. नांदेड आगारातील ४५० कर्मचार्यांचे महामंडळाने निलंबन केले. कारवाईच्या धसक्याने तेथील वाहक दिलीप वीर यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.