तीर्थहळ्ळी (कर्नाटक) येथे गोतस्करांकडून दोघा गोरक्षकांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न !

तीर्थहळ्ळी (कर्नाटक) – मेळिगे येथून अवैधरित्या चारचाकीतून गायी घेऊन जात असलेल्या तस्करांना रोखण्यासाठी प्रयत्न करणारे २ गोरक्षक युवक किरण (वय २३ वर्षे) आणि चरण (वय २४ वर्षे) यांच्या अंगावर गोतस्करांनी वाहन घातल्याने दोन्ही युवक गंभीर घायाळ झाले. (अशा गोतस्करांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा झाली पाहिजे !- संपादक) त्यांना मणिपालच्या चिकित्सालयात भरती करण्यात आले आहे.

गृह सचिव अरग ज्ञानेंद्र युवकांच्या प्रकृतीची चौकशी करतांना

चिकित्सालयात जाऊन गृह सचिव अरग ज्ञानेंद्र यांनी युवकांच्या प्रकृतीची चौकशी केली. याविषयी गृहसचिव अरग ज्ञानेंद्र म्हणाले की, गोरक्षकांना वाहनाखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न करणार्‍यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.