(म्हणे) ‘आम्ही ४० कोटी आहोत, आम्हाला दुर्बल समजू नका !’

मथुरेतील मंदिराविषयी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या विधानावर समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांची धमकी !

  • अशी धमकी देऊन बर्क हिंदूंना घाबरवू पहात आहेत, हे पहाता उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ! – संपादक
  • अयोध्या, मथुरा आणि काशी येथील हिंदूंच्या पवित्र मंदिरांवर मोगलांनी आक्रमणे करून तेथे मशिदी बांधल्या आहेत, हा इतिहास आहे आणि हिंदूंच्या या भूमी पुन्हा मिळवण्याचा हिंदूंना अधिकार आहे अन् तो प्रयत्न उत्तरप्रदेश सरकार करत असेल, तर ते चुकीचे कसे ? उलट अशा प्रकारे धमकी देणार्‍यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे ! – संपादक
समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

संभल (उत्तरप्रदेश) – मथुरेत अयोध्येप्रमाणे स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतात ४० कोटींहून अधिक मुसलमान आहेत. त्यांना दुर्बल समजू नका. जे काही होत आहे, ते कायद्याच्या विरोधात होत आहे. मौर्य जे काही बोलत आहेत, ते शक्तीच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ते मुसलमानांना दुर्बल समजत आहे. त्या वेळी त्यांनी मशीद पाडून मंदिर बनवले आणि आता मथुरेच्या ईदगाह मशिदीला पाडू पहात आहेत; मात्र आम्ही हे होऊ देणार नाही. शेतकर्‍यांनी आंदोलनात जसे प्राण दिले, तसेच प्राण आम्हीही देऊ, अशी धमकी येथील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी दिली आहे.

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘अयोध्या, काशी येथे भव्य मंदिर बांधण्याचे काम चालू आहे आणि त्यानंतर मथुरेची सिद्धता आहे’, यावर बर्क यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना वरील धमकी दिली.

बर्क पुढे म्हणाले की, भाजप उत्तरप्रदेशात येऊ घातलेली निवडणूक हरणार आहे, त्यामुळे अशा प्रकारची विधाने करून हिंदू आणि मुसलमान यांना भडकावले जात आहे. हे सर्व निवडणुका जिंकण्यासाठी केले जात आहे.

अखिलेश यादव मंदिराच्या बाजूने कि विरोधात ? – केशव प्रसाद मौर्य यांचा प्रश्‍न

शफीकुर्रहमान यांच्या चेतावणीवर केशव प्रसाद मौर्य यांनी उत्तर देतांना म्हटले की, शफीकुर्रहमान हे अखिलेश यादव यांच्या टोळीतील आहेत. अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले पाहिजे की, ते मथुरातील मंदिराच्या बाजूने आहेत कि विरोधात ?