पू. (सौ.) अश्विनीताई असती आमुची गुरुमाऊली, दुःखहारिणी आनंददायिनी ।

पू. (सौ.) अश्विनी पवार

पू. अश्विनीताईंचे सुरक्षाछत्र असता आमुच्या शिरी ।
नसे भय, काळजी अन् चिंता देवद आश्रमी ।। १ ।।

पू. अश्विनीताई साधकांचे सत्संग घेऊनी साधनेची घडी बसवती ।
गुरुमाऊली साधकांची आध्यात्मिक प्रगती करवूनी घेती ।। २ ।।

पू. अश्विनीताई आरूढ आहेत साधकांच्या हृदय सिंहासनी ।
साधक-साधिका आणि संत, आनंदाने साधना आणि सेवा करती ।। ३ ।।

पू. शिवाजी वटकर

श्रीसत्‌शक्ति बिंदाताई चैतन्यशक्ती देऊनी पू. अश्विनीताईंना घडवती (टीप १)।
चैतन्यकिरणांनी साधकरूपी फुले उमलती देवद आश्रमाच्या वृंदावनी ।। ४ ।।

पू. अश्विनीताई असती आमुची गुरुमाऊली, दुःखहारिणी आनंददायिनी ।
देवद आश्रमातील साधकांच्या उद्धारा प्रगटली माता भवानी ।। ५ ।।

पू. अश्विनीताई असती सनातनच्या आकाशगंगेतील नक्षत्ररूपी गुरुमाऊली ।
गुरुकार्यानुरूप महासरस्वती, महालक्ष्मी अन् महाकाली यांचे रूप पू. ताई घेती ।। ६ ।।

पू. अश्विनीताई आरूढ व्हाव्यात सद्गुरुपदी, हीच प्रार्थना तीन गुरूंच्या (टीप २) चरणी ।
जन्मदिनी साष्टांग नमस्कार करूया चैतन्यदायिनी पू. अश्विनीताईंच्या चरणी ।। ७ ।।

टीप १ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आरंभापासून पू. अश्विनीताई यांना साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत.

टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.१०.२०२१)