भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन १ घंटा वेळ आणि १ रुपया द्यावा ! – पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन एक घंटा वेळ आणि एक रुपया दिला पाहिजे. याचा उपयोग मठ आणि मंदिरे स्वावलंबी बनवण्यासाठी होईल, असे आवाहन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ‘८० टक्के हिंदू संघटित असून उर्वरित २० टक्के हिंदूंना संघटित करायचे आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.

शंकराचार्य पुढे म्हणाले की, प्राचीन भारत वर्णव्यवस्थेद्वारे चालत होता. आता त्यात पालट झाला आहे. तरुणांना ज्ञान, विज्ञान आणि व्यवहार यांना जोडून हिंदु राष्ट्राची व्यवस्था बनवली पाहिजे. देशातील १०-१० कटुंबे एकत्र येऊन धर्म आणि अध्यात्म यांवर चर्चा करू लागले, तर देश हिंदु राष्ट्राच्या दिशेने अग्रेसर होईल.