पाली (राजस्थान) येथे सैन्यतळाची माहिती पाकला देणार्‍या धर्मांधाला अटक

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! – संपादक

सैन्यतळाची माहिती पाकला देणारा धर्मांध अझरुद्धीन मेवाती

पाली (राजस्थान) – येथील भारतीय सैन्याच्या तळाची माहिती पाकला देणार्‍या अझरुद्धीन मेवाती या गुप्तहेराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे उर्दू भाषेत असलेले काही संदेश सापडले आहेत. त्याच्या चौकशीत त्याच्या घरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने उर्दू भाषेमध्ये लिहिलेले संदेश सापडले आहेत. याविषयी अधिक चौकशी करण्यात येत आहे, तसेच सांकेतिक शब्दांमध्ये लिहिलेली कागदपत्रेही सापडली आहेत. अझरुद्धीन गेल्या ६ वर्षांपासून येथील चांगगेट भागात बटाटे विकण्याचे काम करत आहे. तो मुळचा मध्यप्रदेशातील आहे.