सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सवात जुगार !

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली दु:स्थिती !

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सध्या जत्रोत्सव चालू आहेत; मात्र यामध्ये काही ठिकाणी जुगारही खेळला जात असल्याचे काही घटनांतून स्पष्ट होत आहे. कुडाळ तालुक्यातील एका गावात जत्रोत्सवाच्या वेळी जुगार खेळणार्‍या चौघांवर पोलिसांनी कारवाई केली, तर काळोखाचा लाभ उठवत काही जण पसार झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या वेळी पोलिसांनी ४५ सहस्र रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य कह्यात घेतले.

सावंतवाडी तालुक्यातही एका गावात जत्रोत्सवाच्या वेळी जत्रोत्सवाच्या ठिकाणापासून लांब एका माळरानावर चालू असलेल्या जुगाराच्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. या वेळी पोलिसांच्या भीतीने पळणारे ३-४ जण घायाळ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असल्याचे समजते.

जुगार खेळण्यास शासनाची बंदी असतांनाही जत्रोत्सवात जुगार खेळला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.