पू. काकू(टीप १), आपल्या प्रीतीमय हास्याने । सारे काही मिळून गेले ।
आपली अपार करुणा । लढण्यास स्फूर्ती देते ।। १ ।।
मनाच्या विरोधातील अनेक प्रसंगांमुळे । असाहाय्य झाले होते ।
त्या वेळी भगवंत समवेत आहे । याची साक्ष ठेवोनी कृपेने न्हाऊ घातले ।। २ ।।
देवाचे लक्ष आहे । प्रत्येक क्षणाचा वापर कर ।
असे तुम्ही सांगितले । त्यामुळे स्फूर्ती मिळून मन शांत झाले ।। ३ ।।
टीप १ : पू. (सौ.) संगीता जाधवकाकू
– कु. मनिषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |