उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. ऋग्वेदी अतुल गोडसे ही या पिढीतील एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी (२४.११.२०२१) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील कु. ऋग्वेदी अतुल गोडसे हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. ऋग्वेदी अतुल गोडसे हिला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. ‘ऋग्वेदी सहजतेने आणि आत्मविश्वासाने बोलते.
२. शिकण्याची वृत्ती
अ. तिचा आश्रमातील विविध सेवा आणि कार्यपद्धती समजून घेण्याकडे कल असतो. ‘दिवसभरात काय घडले ? रामनाथी आश्रमातील बालसाधक, उदा. कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय १० वर्षे) आणि कु. वेदश्री भुकन (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ८ वर्षे) यांच्याकडून काय शिकायला मिळाले ?’, हे ती आम्हाला सांगते. (गोडसे कुटुंब काही मास रामनाथी आश्रमात रहायला होते.) ऋग्वेदी प्रसंगांचे अचूक विश्लेषण करते. ती आईच्या समवेत भावसत्संगात बसल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे लिहिण्याचा प्रयत्न करते.
आ. ती दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख वाचण्याचा प्रयत्न करते आणि न समजलेल्या गोष्टी विचारून घेते. तिने दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे, सनातनचे २ रे बालसंत) यांच्या संदर्भातील लेख भावपूर्ण वाचला आणि तो तिला समजला.
३. प्रगल्भता
ऋग्वेदीला तिच्या वयाच्या मानाने पुष्कळ समज आहे. एकदा मी तिचा अभ्यास घेत असतांना ती मला म्हणाली, ‘‘स्वभावदोष दूर होण्यासाठी दोन टप्प्यांत प्रयत्न करायचे. आधी स्वतःच मनाला सांगून त्यावर मात करायची, नाहीतर स्वयंसूचना देऊन मात करायची.’’ मी तिला विचारले, ‘‘तुला हे कुणी सांगितले ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला देव सुचवतो.’’ तिची देवाचे विचार ग्रहण करण्याची क्षमता अधिक आहे. तिचा पाठांतर करण्यापेक्षा समजून घेण्यावर अधिक भर असतो. तिची निरीक्षणक्षमताही चांगली आहे.
४. तिला खाण्या-पिण्याची आवड-नावड नाही.
५. स्वीकारण्याची वृत्ती
तिची वर्ष २०१६ मध्ये आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती आणि वर्ष २०२० मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली. मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना तिची अल्प कालावधीत आध्यात्मिक पातळी वाढल्याच्या संदर्भात सांगितले असता ते म्हणाले, ‘‘तिचा स्वीकारण्याचा भाग चांगला असल्यामुळे झाले.’’
६. चुका सुधारण्याविषयी संवेदनशील
ती ‘फलकावर चूक लिहिणे आणि समष्टीमध्ये चुका सांगणे’, हे मनापासून करते. तिला ‘तुझ्याकडून दिवसभरात काय चुका झाल्या ?’, असे विचारल्यावर ती तिच्याकडून झालेल्या चुका सांगते.
७. कु. ऋग्वेदीचे स्वभावदोष
हट्टीपणा, मोठ्यांचे न ऐकणे, उतावळेपणा आणि चंचल वृत्ती.’
– श्री. अतुल गोडसे (कु. ऋग्वेदीचे वडील) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.९.२०२१)
सेवाभाव असलेली आणि देवद आश्रमात सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व अनुभवणारी कु. ऋग्वेदी गोडसे !
१. ऋग्वेदीने स्वतःहून ‘सेवेत साहाय्य करू का ?’, असे विचारणे
‘२५.१०.२०२१ या दिवशी मी सकाळी पापड वाळवण्याच्या सेवेत साहाय्य करण्यासाठी कु. जयंत मल्या या बालसाधकाला विनंती केली. तेव्हा तेथे जवळच असलेली कु. ऋग्वेदी गोडसे हिने मला विचारले, ‘‘मीपण ही सेवा करू का ?’’ त्यानंतर ती मन लावून आणि एकाग्रतेने सेवा करू लागली.
२. ‘देवद आश्रमात सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे सांगणारी कु. ऋग्वेदी !
आमच्यात (मी, ऋग्वेदी आणि एक बालसाधिका) झालेले संभाषण पुढे दिले आहे.
मी : ऋग्वेदी, तू देवद आश्रमात जाणार ना ?
ऋग्वेदी : हो.
मी : तुला कुठे आवडते ?
ऋग्वेदी : देवद आश्रमात.
एक बालसाधिका : हा आश्रम (रामनाथी) हे वैकुंठ आहे.
ऋग्वेदी : देवद आश्रमही वैकुंठच आहे.
एक बालसाधिका : इथे परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत.
ऋग्वेदी : देवद आश्रमातही सूक्ष्मातून परम पूज्य आहेत.
एवढ्या लहान वयातील ऋग्वेदीचे हे बोलणे ऐकून मला तिचे कौतुक वाटले.
मला अशा दैवी बालिकेसमवेत सेवा करायला मिळाल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२१)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.