हिंदूंनो, भगवंताचे भक्त बनाल, तरच वाचाल ! 

‘आपण हिंदू वृत्तपत्रातील वार्ता केवळ वाचतो. आजचे वृत्तपत्र वाचले की, उद्याचे वाचतो. उद्याचे वाचले की, परवाचे वाचतो. असे नुसते वाचतच रहातो; पण ‘वाचलेल्या वार्ता आणि घडणार्‍या घटना यांमधून आपण कसे वाचणार ?’, याचा विचारच आपण करत नाही. या संदर्भात मनाची झालेली प्रक्रिया आणि आलेले अनुभव श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

श्री. हर्षद खानविलकर

हिंदूंनो, अजून किती दिवस केवळ वाचाल ?

वृत्तपत्रात आलेल्या वार्ता आणि लेख अजून किती दिवस केवळ वाचणार ?

१. आमच्या धर्मावर टीका आणि देवतांची विटंबना होते, आमच्या संतांवर टीका होते, संत आणि हिंदुत्वनिष्ठ याच्यांवर खोटे आरोप लावले जातात, बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात ‘असहिष्णु’ म्हटले जाते आणि आम्ही केवळ वाचन करतो.

२. आमच्या बहिणी आणि मुली धर्मांधांकडून लव्ह जिहादमध्ये फसवल्या जातात आणि त्यांच्यावर हात टाकला जातो; आम्ही केवळ वाचत रहातो.

३. आमच्या हिंदूंचे ख्रिस्त्यांकडून धर्मांतर केले जाते; आम्ही केवळ वाचत रहातो.

४. आमच्या मंदिरांचा पैसा लुटला जातो; आम्ही केवळ वाचत रहातो.

५. आमचे हिंदुत्वनिष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होतात, आम्ही केवळ वाचत रहातो.

६. आमच्या गोमातेच्या हत्या होतात, त्यांची तस्करी केली जाते; आम्ही केवळ वाचत रहातो.

७. आमच्या देशाचे तुकडे करण्याच्या आणि आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात; आम्ही केवळ वाचत रहातो.

अजून किती दिवस केवळ वाचत रहाणार आहोत आणि काय काय वाचणार आहोत ? ‘मुळात हिंदूंनी ‘वाचाल’ या शब्दाचा अर्थच चुकीचा लक्षात घेतला आहे का ?’, असे वाटते. ‘वाचाल, तर वाचाल’, या वाक्याचा खरा अर्थ हिंदूंनी आतातरी समजून घ्यायला पाहिजे.

मुळात आताच्या एकंदरित परिस्थितीमध्ये ‘वाचाल’, म्हणजे…

कृती कराल, संघर्ष कराल, तर वाचाल. समाजामध्ये जनजागृती कराल अन् स्वतःच स्वतःचे रक्षण करायला शिकाल, तर वाचाल. अन्यायाविरुद्ध वाचा फोडाल, तर वाचाल; धर्माचरण कराल, तर वाचाल. संघटित व्हाल, तर वाचाल; राष्ट्र आणि धर्म यांसाठीचे स्वतःचे कर्तव्य जाणून ईश्वरी अधिष्ठान वाढवाल अन् भगवंताचे भक्त बनाल, तर वाचाल.

हिंदूंनो, आता देव, देश आणि धर्म यांना वाचवण्याचा पण करूया. धर्म हा राष्ट्राचा प्राण असतो. धर्म टिकला, तर राष्ट्र टिकेल आणि जर धर्मच टिकला नाही, तर देश अन् हिंदू टिकणार नाही. यासाठी भगवंताला शरण जाऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि रामराज्यामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी ‘वाचायला’ आरंभ करूया.

‘श्री गुरुदेवांच्या कृपेने देवाने दिलेले हे विचार लिहू शकलो’, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘हिंदु राष्ट्र जगण्यासाठी वाचायला शिकवा’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना आहे.’

– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (१.४.२०२०)