मूळचे जामखेड, नगर येथील आणि मार्च २०१७ पासून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणारे श्री. किसन राऊत आश्रमातील ‘नसचिकित्सा’ (‘न्यूरोथेरपी’) या विभागात सेवा करतात. त्यांच्याविषयी सहसाधक आणि त्यांची मुलगी कु. मनीषा यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सौ. केशवी किशोर आमाती
१ अ. किसनदादा भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करतात.
१ आ. स्वतःला पालटण्याची तळमळ : त्यांच्यात ऐकण्याची वृत्ती आहे. त्यांना त्यांची चूक सांगितल्यास ते लगेच स्वीकारतात आणि क्षमायाचना करतात. किसनदादांमध्ये स्वतःला पालटण्याची तळमळ असून त्यांच्यात अहंचे प्रमाण अल्प आहे.
२. सौ. गौरी चौधरी
२ अ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : एकदा आम्ही दादांसमवेत राजस्थानहून गोव्याला येत होतो. त्या वेळी ते प्रवासात वेळ वाया न घालवता व्यष्टी साधना करत होते.
३. श्री. निमिष म्हात्रे
३ अ. नम्रता आणि इतरांना समजून घेणे : ते नम्रतेने बोलतात. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यही पूर्णवेळ साधना करत असल्याने किसनदादा त्यांना सांभाळून घेऊन सेवा करतात.
३ आ. शिकण्याची वृत्ती : त्यांची नवीन सेवा शिकण्याची सिद्धता असते. नवीन सेवा शिकतांना कितीही अडचणी आल्या, तरी ते सेवा पूर्ण शिकण्याचा प्रयत्न करतात.
३ इ. त्यांच्यात संतसेवेप्रती भाव जाणवतो.
४. कु. मनीषा राऊत (श्री. किसन राऊत यांची मुलगी)
४ अ. ते आश्रमात, तसेच घरीही विचारून सेवा करतात.
५. कु. साधना पाटील
५ अ. तत्त्वनिष्ठ : किसनदादांना सहसाधकाची एखादी चूक लक्षात आल्यास ते लगेचच त्या साधकाला साधनेच्या दृष्टीने साहाय्य म्हणून त्या चुकीची जाणीव करून देतात.
५ आ. विचारण्याची वृत्ती : त्यांना सेवेमध्ये अडचणी आल्यास ते लगेच विचारून घेतात आणि सेवेत तसा पालट करतात.
६. श्री. समृद्ध चेऊलकर
६ अ. साधकांना साहाय्य करणे : किसनदादा साधकांना साहाय्य करण्यासाठी नेहमी पुढाकार घेतात. एखाद्या साधकाची प्रकृती ठीक नसल्यास किसनदादा त्या साधकाला काही हवे-नको, ते पहातात. (मे २०२१)