पाकमधून देहलीत आलेल्या हिंदु शरणार्थींचे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून केले जात आहे धर्मांतर !

भारताच्या राजधानीत असे होणे हिंदूंना लज्जास्पद ! हा प्रयत्न हिंदु संघटनांनी वैध मार्गाने रोखणे आवश्यक आहे ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी देहली – पाकमध्ये धर्मांधांच्या अत्याचारांमुळे त्रस्त होऊन भारतात आलेले पाकिस्तानी हिंदू विविध ठिकाणी रहात आहेत. देहलीतील मजनू का टिला येथेही मोठ्या संख्येने हिंदू रहात आहेत. या हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचे समोर आले आहे.

१. या हिंदूंना अद्याप मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. अशा वेळी ख्रिस्ती मिशनरी त्यांना मूलभूत साहित्य देऊन त्यांची माहिती गोळा करत आहेत. हिंदूंनी ही माहिती दिली नाही, तर त्यांना हे साहित्य दिले जात नाही, असे समोर आले आहे.

२. हे शरणार्थी हिंदू जेथे रहातात, त्याच्या जवळील एका मंदिरात देखरेखीचे काम करणार्‍या उर्मिला राणी यांनी सांगितले की, ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या ३ हिंदू शरणार्थींनी  ख्रिस्ती पंथ स्वीकारला आहे. येथे खिस्ती मिशनर्‍यांचे नेहमीच येणे-जाणे चालू असते. लोकांनी त्यांना येथे येण्यास बंदी घातल्यानंतर ते अन्य नावांनी येथे येत असतात.

३. मंदिरांच्या पुजार्‍यांनी सांगितले की, शरणार्थी हिंदूंच्या गरीबीचा अपलाभ उठवून धर्मांतर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. हिंदूंनी धर्मांतर करण्यास नकार दिल्यावर खाण्यापिण्याविषयी अडथळे निर्माण केले जाऊ शकतात, असे हिंदूंना वाटते. त्यामुळे हिंदू त्यांना थेट विरोध करत नाहीत. येथे रामलीलेचे आयोजन करण्यास विरोध केला जातो. या हिंदूंना नाताळ साजरा करण्यास सांगितले जात आहे.