गत ३५ वर्षांपासून महानिर्मितीकडे असलेल्या कोयना धरणाची खासगीकरणाकडे वाटचाल ?

सातारा, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’, या तत्त्वानुसार राज्यातील ३५ वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे नूतनीकरण, अधुनिकीकरण आणि परिचालन करण्यासाठी निविदा मागवल्या जाणार आहेत. या सर्व प्रक्रियेमुळे कोयना धरणाची खासगीकरणाकडे वाटचाल चालू असल्याचे संकेत आहेत.

धरणाची निर्मिती वर्ष १९६३ मध्ये झाली. हे धरण सातारा शहरापासून ९८ किलोमीटर, तर पाटण शहरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. धरणक्षमता १०५ टी.एम्.सी. एवढी असून जलविद्युत प्रकल्पाची क्षमता १९२० मेगावॅट आहे. ३५ वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाकडून कोयना धरण ‘महानिर्मिती’कडे हस्तांतरित करण्यात आले होते; मात्र पुन्हा ते जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचाली चालू आहेत.