मुंबई, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – यापुढे शासनमान्य रास्तभाव / शिधावाटप दुकानांमध्ये आंघोळ आणि कपडे धुण्याचा साबण, ‘हॅण्डवॉश’, धुण्याचा सोडा, शाम्पू, चहापत्ती आणि कॉफी या वस्तूही ठेवण्यात येणार आहेत. १७ नोव्हेंबर या दिवशी शासनाने याविषयीचा आदेश काढला. या वस्तू अस्थायी स्वरूपात विक्रीसाठी असतील. यामध्ये रास्तभाव दुकानदार आणि संबंधित आस्थापन अन् घाऊक-किरकोळ विक्रेते यांमध्ये हा व्यवहार परस्पर असणार आहे. यामध्ये शासनाचा हस्तक्षेप असणार नाही.